Viral Video of Elephants : China मध्ये हे हत्ती असे दमून का झोपले आहेत? I (BBC News Marathi)#ViralVideo #Elephants #SleepingElephants #Travel #Wildlife

चीनमध्ये हत्तींचा हा कळप गेल्या पंधरा महिन्यांपासून चालत प्रवास करत आहे. आपला नैसर्गिक अधिवास सोडून हे हत्ती आतापर्यंत 500 किलोमीटर दूरवर आले आहेत. शेतं, गावं आणि अगदी शहरं ओलांडत हे हत्ती पुढे जात आहेत, तसं सरकारी अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. हे हत्ती आपली नेहमीची राहायची जागा सोडून का आणि कधी बाहेर पडले असावेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या प्रवासाच्या कहाणीनं जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

%d bloggers like this: